अरेरे! मुंबईत एसी लोकल ट्रेनवर दगडफेक, अनेक डब्यांच्या फुटल्या काचा, पण का? जाणून घ्या
Mumbai Local Stones Pelted: मुंबई लोकल ट्रेन ही मुंबई शहराची `लाइफ लाईन` मानली जाते. रोज लाखो मुंबईकर ट्रेनमधून प्रवास करतात.
Mumbai Local Stones Pelted: मुंबई लोकलसंदर्भात धक्कादाय बातमी समोर येत आहे. बुधवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी चालत्या एसी लोकल ट्रेनवर (मुंबई एसी ईएमयू लोकल) दगडफेक केली. त्यामुळे अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या. यानंतर स्थानक परिसरात खळबळ माजली आहे. कशी घडली ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई लोकल ट्रेन ही मुंबई शहराची 'लाइफ लाईन' मानली जाते. रोज लाखो मुंबईकर ट्रेनमधून प्रवास करतात. पण मुंबईकरांच्या याच लाईफलाईनवर काही हल्लेखोरांनी दगडफेक केली आहे. दगडफेकीत सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. दुसरीकडे दगडफेकीची माहिती मिळताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मुंबईच्या चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान धावणाऱ्या एसी लोकल ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. एसी लोकल कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान (बोरिवली-कांदिवली) पोहोचली तेव्हा त्यावर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ही घटना दुपारी 3.38 च्या सुमारास घडली. दगडफेकीत एसी लोकलच्या पाच ते सहा खिडक्यांच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
एसी लोकलवर दगडफेक करणारे कोण आहेत? आणि त्यांनी असे का केले याचा तपास मुंबई रेल्वे पोलीस करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
मुंबईत सीएनजी पीएनजीच्या दरात कपात
महागाईने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली आहे. कंपनीने तशी अधिकृत घोषणा केली आहे. प्रसिद्धीपत्रक जारी करत कंपनीने ही माहिती दिली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करत मुंबईकरांना महिन्याच्या सुरुवातीलाच चांगली बातमी दिली आहे. घरगुती वापरामध्ये आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचं प्रमाण वाढावं यासाठी ही कपात केली असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवे दर 2 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. सध्या मुंबईत ग्राहकांना सीएनजीसाठी प्रती किलो 76 रुपये मोजावे लागतात. तर पीएनजीसाठी 47 रुपये मोजावे लागतात. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. तसंच पीएनजीच्या दरात 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 2 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.