मुंबई : Mumbai Local Train Latest News Today: कोरोना काळात लोकलमधून (Mumbai Local ) प्रवासाची मुभा नव्हती. मात्र, आता कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर दोन डोस झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. (Mumbai Local Train ) पूर्ण क्षमतेने लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येत आहे. आता मुंबई एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांना खूशखबर आहे. (Mumbai Local Train: Good News For Passengers, Railways Plans To Convert Suburban Network To AC Trains, Ticket Fare to be Reduced Soon)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही क्लासचे तिकीट असलेल्यांना एसी गाडीत प्रवेश मिळावा, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मांडला आहे. गाडीत शिरल्यावर त्या अंतराचा डिफरन्स प्रवाशांना द्यावा लागेल. जास्त मुंबईकरांना एसी लोकलमध्ये प्रवास करता यावा हा याचा उद्देश आहे. तसेच एसी लोकलचे भाडं कमी करण्याचाही विचार रेल्वे बोर्ड करत आहे. 


लोकल रेल्वेचे भाडेही कमी होण्याची शक्यता आहे आणि ते मेट्रोच्या भाडे रचनेवर आधारित असेल. दरम्यान, भारतीय रेल्वेने सेमी-एसी लोकल ट्रेन चालवण्याची योजना स्थगित ठेवली आहे. 


MRVC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) रवी अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, “आम्ही मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्स (MUTP) अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी सर्व पूर्णपणे एसी लोकल गाड्या खरेदी करणार आहोत.


अहवालानुसार, MRVC येत्या काही दिवसांत 283 नवीन AC लोकल गाड्या खरेदी करणार आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने AC लोकल गाड्यांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठीची कालमर्यादा अद्याप ठरलेली नसल्याचे रेल्वेने सांगितले.


सध्या, मुंबईत उपनगरीय नेटवर्कवर नऊ एसी गाड्या धावत आहेत आणि प्रथम श्रेणीच्या डब्यांपेक्षा जास्त भाडे आणि गाड्यांची कमी वारंवारता यामुळे लोकांचा प्रतिसाद तितकासा उत्साही नाही. त्यामुळे हा नवीन बदल करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.