Mumbai Local News :  मुंबईकरांसाठी मोठी बातमी. ( Mumbai News ) मुंबईत जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार असून एसी लोकल वाढविण्यात येणार आहे. ( Mumbai AC Local ) त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावा मार्ग टाकण्यात येणार आहे. तर सीएसएमटी-कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करणार येणार आहे.  ( Mumbai Local )तसेच ठाणे - वाशी - पनेवल मार्गावर आणखी एका रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी भेट असणार आहे. ( Mumbai News in Marathi 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत एसी लोकल्सची संख्या कमालीची वाढणार आहे. एमयुटीपी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात 1100 कोटींची तरतूद करण्यात आलीय. एमयुटीपी 3 अंतर्गत 47 तर एमयुटीपी 3 ए अंतर्गत 191 अशी 238 वातानुकूलित लोकलची खरेदी करण्यात येईल. 
एआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे 2600 कोटींचा निधी मागितला होता. त्यातील 1100 कोटी रुपये मंजूर झालेत. केंद्राच्या रकमेएवढा निधी राज्य सरकारला द्यावा लागेल. त्यामुळे एमयुटीपीला एकूण २२०० कोटी रूपये मिळणार आहेत. एसी लोकल खरेदीसह पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरी मार्गावरील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. 


दिघा रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात


ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे (Digha suburban railway station ) काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच महिन्याच्या अखेरीस स्टेशन तयार होऊन लोकल गाडयांना थांबा मिळण्याची शक्यता आहे. (Digha suburban railway station between Thane and Airoli to be ready?)


ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते ऐरोली दरम्यानचे दिघा उपनगरीय रेल्वे स्थानक (Digha  railway station) पुढील महिन्याच्या सुरुवातीला सार्वजनिक वापरासाठी सज्ज होणार असून परिसरातील औद्योगिक पट्ट्यातील हजारो स्थानिक रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. कारण या स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.