Mumbai Local Train Update: मुंबई शहर व उपनगरात लोकसंख्या वाढली आहे. आता मुंबईनजीकच्या शहरातही लोकवस्ती वाढली आहे. कार्यालये मुंबईत असल्यामुळं प्रवाशांना लांबचा प्रवास करुन मुंबईत यावे लागते. अशावेळी मुंबई लोकलने प्रवास करणे आलेच. मुंबई लोकलच्या वाढत्या गर्दीमुळं प्रवासात अनेक अडचणी येतात. प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी रेल्वेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातीलच एक म्हणजे कर्जत-पनवेल कॉरिडॉर. या मार्गामुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल ट्रेनच्या विस्तारासाठी मुंबईनजीकच्या पनवेल-कर्जत या कॉरिडॉरसाठी बोगद्याचे काम अंतिम टप्यात आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) 3 अतर्गंत पनवेल-कर्जत या मार्गात 29.6 किमीचा कॉरिडॉरचे निर्माण केले जात आहे. या मार्गातील महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तीन बोगदे. या बोगद्याचे ड्रिलिंगचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे काम आत्तापर्यंत 50 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होऊ शकते. 


3 किमीपर्यंतचे तीन बोगदे


मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (MRVC) अलीकडेच मुख्य बोगद्यासाठी 2 किमी पर्यंतचे खोदकाम पूर्ण केले आहे. या प्रकल्पातर्गंत असेलेल तीन बोगद्यांची एकूण लांबी 3,144 मीटर आहे. यातील 219 मीटर लांबीच्या बोगदा-१( नढाल बोगदा)चे खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 2,625 मीटर लांबी असलेल्या वावरली येथील दुसऱ्या बोगद्याचे काम आणि 300 मीटर लांबी असलेल्या किरावली बोगद्याचे काम सध्या सुरू आहे. पहिल्या बोगद्याचे वॉटरप्रुफिंग आणि काँक्रिट लायनिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर, गिट्टी आणि रेल्वे रूळांचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या व सर्वाधिक लांबीच्या वावरली बोगद्यासाठी 2,038 मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. 


पनवेल-कर्जत मार्गावर पाच स्थानके असणार आहेत. या प्रकल्पामुळं नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील गावांना कर्जतपर्यंत जोडता येणार आहे. त्यामुळं एमएमआरचा विस्तार होणार आहे. यामुळं मुंबई लोकलला एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. तसंच, पनवेल आणि कर्जतच्या दरम्यान नवीन कॉरिडॉर जवळच्या भागात विकासही होणार आहे. 


पनवेल-कर्जतच्या मार्गावर पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाला डिसेंबर 2016 रोजी मंजूरी मिळाली होती. तर, हा प्रकल्प 2025 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण आणि ठाणे स्थानकातील गर्दी विभागणार आहे.