१ फेब्रुवारीपासून लोकलमध्ये होणार `हे` मोठे बदल
UTS ऍप प्रवाशांकरता होणार सुरू
मुंबई : सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयाचाही ग्रीन सिग्नल यासाठी मिळाला आहे. (Local Train Start 1st February) मात्र प्रवाशांना याकरता वेळेचं बंधन असणार आहे. गर्दीची वेळ टाळत प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. प्रवाशांच्या या प्रवासावर रेल्वे प्रशासनाची करडी नजर असणार आहे. १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु होणार असून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याचे मुख्यमत्र्यांनी आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाचाही ग्रीन सिग्नल मिळालेला आहे.
१ फेब्रुवारीपासून UTS ऍप पुन्हा सुरू होणार
सामान्यांसाठी सेवा सुरू केल्यानंतर तिकीट खिडकीवरील गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी UTS ऍप सुरू होणार आहे. हे ऍप दिलेल्या रेल्वेच्या वेळेत सुरू असणार आहे.
रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण
१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर रेल्वे आणि स्टेशनवर सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकुर यांनी दिली आहे. त्याचसोबत ठाकुर यांनी रेल्वे प्रवाशांना कोरोना संबंधीत नियमांचं पालन करण्याच आवाहनही केलं आहे.
मध्य रेल्वेचे सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या वेळेत आम्ही खास टीम तयार केली आहे. ही टीम रेल्वेतील डब्बे आणि सीट सॅनिटाइज करणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासाच्या वेळेनुसार तिकीट खिडक्यांचे काऊंटर देखील खुले असतील. तसेच रेल्वे स्थानकावर जाण्याकरता एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट्स वाढवण्यात येणार आहेत. रेल्वे कर्मचारी आणि पोलीस स्टाफ प्रवाशाच्या वेळी गर्दी सांभाळतील.
नियम न पाळण्यास होणार कठोर कारवाई
राज्य सरकार आणि रेल्वेने मंजूर केलेली वेळ वगळून अन्य वेळेत प्रवास केला तर त्या प्रवाश्यांना कठोर शिक्षा होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि रेल्वे कायदा यानुसार त्या प्रवाश्यांवर कारवाई होईल. असं स्पष्टीकरण मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केलं.
त्यामुळे सामान्य जनतेला लोकलने प्रवास करताना वेळ पाळणं बंधणकारक आहे. राज्य सरकार आणि रेल्वेने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला पण आता सरकारवर अधिक ताण पडणार आहे. गर्दी टाळण्यासाठी ठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकांवर सुरक्षा सुरक्षा पुरवण्यासाठी 2000 होमगार्ड आणि 650 सुरक्षा पुरवण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात रेल्वे पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. शिवाय कोणतीही अडचण अल्यास प्रवासी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क प्रवासी साधू शकतात.
सर्वसामान्य लोकांसाठी वेळ
पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपपर्यंत
दुपारी १२ ते 4 वाजेपर्यंत
रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत
बाकीच्या वेळेत याआधी परवानगी दिलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवाशांनाच लोकल उपलब्ध असणार आहे.