Central Railway Megablock: मध्ये रेल्वेने ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे घेतलेल्या ब्लॉकमुळं गेले तीन दिवस प्रवाशांना मनस्पात सहन करावा लागला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे 36 तासांचा तर ठाणे येथे 63 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आज रविवारी 2 जून रोजी हा मेगाब्लॉक संपुष्टात येत आहे. मात्र, त्यापूर्वीच ठाण्याचे प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नियोजीत वेळेच्या आधीच हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले. ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशावेळी याच प्लॅटफॉर्मवर लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील थांबतात त्यामुळं लोकल प्रवासी आणि इतर प्रवाशांचीही गर्दी होते. अशावेळी कधीकधी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीही निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. आता ठाण्यात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम नियोजीत वेळेच्या आधीच पूर्ण झाले आहे. लोकलची ट्रायर रनदेखील यशस्वी झाली आहे. वेळेच्या आधी काम पूर्ण झाल्याने लवकरच लोकल वाहतूक सुरू होणार आहे. 


EMUचा पहिला ट्रायल रेक ठाणे येथे रुंदीकरण केलेल्या PF5 वर यशस्वीरीत्या पार करत आहे. लोकलची ट्रायरल रनदेखील यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याचबरोबर, CSMT ते ठाणे या मार्गावर दुपारी 3 नंतर लोकल सेवा नियमितपणे पुरवली जाणार आहे. त्याचबरोबर, दुपारी 12:30 वाजता CSMT स्थानकावराचा  ब्लॉक येणार संपुष्टात आला आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेने 36 तासांचा जारी केलेला मेगाब्लॉक 12:30 वाजता संपला असून भायखळा, वडाळा स्थानकापर्यंत थांबलेल्या लोकल ट्रेन आता सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने  धावत आहेत.


फलाट रुंदीकरणाचा फायदा काय होणार?


रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर मुंबईहून कर्ज, कसारा, बदलापूर, कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर, सहावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद रेल्वेगाड्या थांबतात. अनेकदा या प्लॅटफॉर्मवर उभं राहणे खूप कठिण जाते. कधीकधी चेंगरा चेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने फलाटाची रुंदी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. फलाटाची रुंदी वाढल्यानंतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळणार आहे. तसंच, फलाट क्रमाक पाचला जोडून असलेल्या सहावर होणारी गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.