Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्षात दोन नव्या लोकल दाखल होणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि सहज होणार आहे. मध्य रेल्वेच्या नेरूळ-बेलापूर ते उरण विभागात धावणाऱ्या जुन्या रेट्रोफिट लोकल इतिहासजमा होणार आहेत. त्याजागी दोन नॉन एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल म्हणजे मुंबईकरांसाठी लाइफलाइन. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लोकलवरील ताण वाढत आहे. गर्दी वाढत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसंच, मुंबई व पश्चिम उपनगरांप्रमाणेच नवी मुंबईतही लोकसंख्या वाढत आहे. नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. अनेक मोठं मोठी कार्यालयेदेखील नवी मुंबईत होत आहेत. त्यामुळं मुंबईतून नवी मुंबईत जाणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. हार्बर मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून होताना दिसत आहे. 


गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या एसी लोकल दाखल झाल्या होत्या. या लोकलच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामुळं नवीन वर्षात नेरूळ-बेलापूर ते उरण मार्गावर नव्या लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या बेलापूर-नेरूळ ते उरण पोर्ट मार्गावर दररोज रेट्रोफिट तीन आणि सिमेन्स लोकलची एक अशा चार लोकलच्या ४० फेऱ्या होत्या. यातील काही रेट्रोफिट लोकल गाड्यांचे आयुर्मान संपत आले आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन कोऱ्या नॉन एसी लोकल धावणार आहेत. 


रेट्रोफिट लोकल या जुनाट पद्धतीच्या असून त्यांचा वेग कमी आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेट्रोफिट लोकल २०१६ ते २०११ मध्ये रेट्रो फिट केलेल्या आहेत. एका लोकलचे आयुर्मान २५ वर्षे असते. नवीन येणाऱ्या दोन्ही लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोचिंग कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत आहे. या दोन लोकलपैकी एका लोकलची चाचणी सुरू आहे. तर दुसऱ्या गाडीची चाचणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 


नवीन लोकल या अधिक हवेशीर आणि आरामदायी असणार आहेत. तसंच, सर्व डब्यांमध्ये एलईडी लाइट्स आणि स्टेनलेस स्टीलच्या सीट्स असणार आहे. त्याचबरोबर सर्व पंख्यांना स्टेनलेस स्टीलची जाळी, मोठी आसने आणि मधल्या भागात अधिक जागा असणार आहे. त्यामुळं नव्या लोकलमध्ये प्रवासी क्षमता अधिक असणार आहे.