मुंबई : मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत. ते महिलांच्या अंगावर पडल्याने दोन महिला जखमी झाल्यात. कल्याण येथील रुग्णालयात या महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदार वर्गाला बसला आहे. कार्यालयात पोहोचायला आता उशिर होणार असून लेटमार्क बसणार आहे. त्यामुळ मध्य रेल्वेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूरहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. असे असताना पुन्हा मध्य रेल्वे का विस्कळीत होते, असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. पेंटाग्राफ तुकडे झालेत. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली. ही तुटलेली वायर दोन महिलांच्या अंगावर पडली. यात दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. 


दरम्यान, बदलापूर-सीएसएमटी लोकलला अपघात झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत. लोकलमधील लेडीज फर्स्ट क्लासच्या महिलाच्या अंगावर हे पेंटाग्राफचे तुकडे पडले. त्यामुळे या अपघातात दोन महिला जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिलांना कल्याण रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


बदलापूर -सीएसएमटी लोकलचा पेंटाग्राफ तुटून रुचिता सभागाने आणि निशा कुलकर्णी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कल्याणमधील मध्य रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.