VIRAL VIDEO : (Mumbai Local) मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखे काही असे किस्से असतात जे ऐकत असताना, बापरे तुम्ही असा जीव मुठीत घेऊन प्रवास करता? हाच प्रश्न या शहरात येणारा प्रत्येक नवा व्यक्ती विचारतो. घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आणि लोकलमधून प्रवास करणारी तुडुंब गर्दी म्हणजे अनेकांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय. याच मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


हेसुद्धा वाचा : Mumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणार असाल तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जिथं मुंबईच्या रेल्वेतून प्रवास करत असताना एका सुशिक्षित तरुणीनं दाखवलेला उद्दामपणा आणि सहप्रवाशांशी संवाद साधण्याची तिची पद्धत अनेकांच्याच तळपायाची आग मस्तकाच पोहोचवणारी होती. 


त्या प्रवासात नेमकं काय घडलं? 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की एक तरुणी ट्रेनमध्ये बसून तिनं समोरच्या सीटवर पाय ठेवे आहेत. तिनं तिथे पाय ठेवल्यामुळं त्या सीटवर असणाऱ्या प्रवाशाला बसण्याच अडचणी येत होत्या. शेवटी त्यानं तिला पाय खाली ठेवण्यास सांगितलं. क्षणात काय बिनसलं काहीच ठाऊक नाही, पण ही तरुणी मोठ्या आवेगानं वागू लागली आणि तिनं पाय खाली घेण्यास नकार दिला. वादाची ठिणगीही पडली. समोरच्या व्यक्तीनं हे सर्व शूट करण्यास सुरुवात केली आणि त्या तरुणीच्या लक्षात येताच तिनं त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्नही केला. 



तीस सेकंदांच्या व्हिडीओवर प्रचंड संताप... 


सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा अवघ्या 30 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सध्या या तरुणीवर अनेकांनीच आगपाखड केली आहे. स्वत:ची चूक असूनही तिचं असं वागणं मुळीच योग्य नसल्याचं म्हणत असल्या प्रवाशांना धडा शिकवलाच पाहिजे असाही सूर अनेकांनी आळवला. सध्या हा व्हिडीओ सर्वच माध्यमांवरून प्रचंड व्हायरल होत आहे. तुमच्यासोबत रेल्वे प्रवासात असा प्रसंग घडलाय का?