मुंबई : Mumbai CNG PNG Costly : पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडल्यानंतर आता मुंबईत सामान्यांना महागाईचा झटका लागला आहे. आजपासून मुंबईत CNG आणि PNG म्हणजे घरगुती गॅस दरातही वाढ होणार आहे. (Mumbai: Mahanagar Gas Ltd To Hike CNG & PNG Prices From July 14; Check Revised Rates) याच महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 25.50 रुपये प्रती सिलेंडर मागे वाढले आहेत. 


मुंबईत महागलं CNG PNG


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Ltd)ने मुंबईत CNG आणि PNG चे दर वाढवले आहे. CNG च्या दरात 2.58 रूपये प्रति किलोग्रॅममध्ये वाढले आहेत. आता याची किंमत 51.98 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढलं आहे. याआधी याची किंमत 49.40 रुपये प्रति किलोग्रॅम वाढली आहे. या वाढत्या दरांना आजपासून सुरूवात होणार आहे. 


PNG च्या दरात 55 पैसे प्रति SCM वाढ झाली आहे. घरगुती पाईपलाईन गॅस स्लबॅ 1 करता 30.40 रुपये प्रति यूनिट आणि स्लॅब 2 करता 36 रुपये यूनिट रेट आहे. महत्वाचं म्हणजे वाढलेल्या दरात टॅक्सचा देखील समावेश आहे. 



महानगर गॅस लिमिटेडचा दावा 


PNG, CNG चे दर वाढल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडकडून महत्वाची माहिती देण्यात आली. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या तुलनेत CNG स्वस्त आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत CNG 67% आणि आणि 47% स्वस्त आहे. तर MGL ची CNG चा घरगुती गॅस सिलेंडर 35 टक्के आकर्षक बचत करते. यामध्ये तुमच्या सुविधा, सुरक्षा आणि विश्वासाची देखील काळजी घेतली जाते. 


सार्वजनिक प्रवास महागणार 


महानगर गॅस लिमिटेडच्या वाढत्या किंमतींमागे प्रवास खर्च आणि दुसऱ्या खर्चांचा देखील समावेश आहे. मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BESTच्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. 


8 जुलै रोजी दिल्लीत CNG, PNG च्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत CNG चा दर 90 पैसे प्रति किलोग्रॅम वाढलं आहे. तर PNG च्या किंमतीत ही वाढ झाली आहे. दिल्लीत घरगुती PNG चे दर 28.41, SCM चे दर 29.66 रुपये झाले आहेत.