देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई:  जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, दिनांक 2 मे  रोजी रात्री 10 वाजेपासून शुक्रवार, दिनांक 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा  बंद राहणार आहे. आर दक्षिण विभागामध्ये मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शन पर्यंत नवीन जोडरस्‍त्‍यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्री10 वाजेपासून 24 तासांकरिता जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. त्‍यामुळे गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्र10 वाजेपासून शुक्रवार, दिनांक3 मे  रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
 
आर दक्षिण विभागातील मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनदरम्‍यानची 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जीर्ण झाल्‍याने ती बदलण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनी अंथरल्यानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होण्‍याबरोबरच जलवाहिनीतील दाब वाढण्यास मदत होणार आहे. त्‍यामुळे कांदिवली पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार आहे.
 
महानगरपालिकेच्‍या जल अभियंता खात्यातर्फे सदर कामे केली जात आहेत. कांदिवली (पश्चिम) येथे वसंत संकूल समोर, नवीन जोडरस्‍ता आणि बोरसापडा मार्ग जंक्शन येथे 1200 मिलीमीटर x 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवार, दिनांक 2 मे  रोजी रात्री 10 वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी बदलण्‍याचे काम झाल्यानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
 
जलवाहिनी जोडणी कामांमुळे आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील खालील नमूद केलेल्या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
 
आर दक्षिण विभाग  - जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्री 1.30 ते मध्यरात्री 2.55) – दिनांक 3मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील (दिनांक 2 मे  मध्य रात्रीनंतर)
 
आर दक्षिण विभाग - लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पखाडी, भाबरेकर नगर, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 3.40 ते पहाटे 5.50) - दिनांक 3 मे  रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
 
आर दक्षिण विभाग - म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्‍वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी 9 ते सकाळी 11 वाजेपर्यंत) - दिनांक3 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
 
 आर दक्षिण व आर मध्य विभाग - चारकोप म्हाडा (सेक्टर - 1 ते 9) (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी 11.45 ते दुपारी 2.05 ) - दिनांक 3 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
 
आर दक्षिण विभाग – पोईसर, महावीर नगर, इंदिरा नगर, बोरसापाडा मार्ग, स्‍वामी विवेकानंद मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.45) - 3 मे  रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
 
 आर मध्‍य विभाग - शिंपोली, महावीर नगर, सत्या नगर, वझिरा नाका, बाभई, जयराज नगर, एक्सर, सोडावाला गल्ली, योगी नगर, रोकडिया गल्ली, सरदार वल्‍लभभाई पटेल मार्ग, पोईसर व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्‍वामी विवेकानंद मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ० 7.10 रोजी रात्री 9.55) दिनांक3 मे  रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
 
संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे.