मुंबई : मध्य रेल्वे लवकरच मुंबई ते मनमाड रेल्वे सुरु करणार आहे. येत्या १२ सप्टेंबरपासून मुंबई ते मनमाड दरम्यान ही विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२ सप्टेंबरपासून दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि मनमाडला रात्री २२.५० वाजता पोहोचणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड येथून १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.०२ वाजता ही रेल्वे सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी १०.४५ वाजता पोहोचणार आहे. ही रेल्वे दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड आणि लासलगाव या स्थानकांवर थांबणार आहे.


या विशेष रेल्वेमध्ये १७ द्वितीय आसन श्रेणी + ३ वातानुकूलित चेअर कार असणार आहेत. या विशेष रेल्वेच्या बुकिंगच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहे. ही रेल्वे सुरु करताना प्रवाशांनी बोर्डिंग आणि प्रवासादरम्यान कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.


मनमाड-मुंबई रेल्वेने दररोज अनेक प्रवास याआधी प्रवास करत होते. पण लॉकडाऊनमध्ये अनेक कर्मचारी घरीच आहेत. या रेल्वेतून पास धारकांना देखील प्रवासाची मुभा मिळणार का याबाबत रेल्वेकडून अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.