मुंबई मॅरेथॉनमध्ये ८५ वर्षाचा `तरुण` धावतो तेव्हा...
बी. आर. जनार्दन... वय वर्ष ८५, मात्र तरीही तरुण. कारण ते मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर धावणयासाठी सज्ज झाले आहेत.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : १४ व्या मुंबई मॅरेथॉनला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या हस्ती धावताना दिसत आहेत.
बी. आर. जनार्दन... वय वर्ष ८५, मात्र तरीही तरुण. कारण ते मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर धावणयासाठी सज्ज झाले आहेत.
जनार्दन यांची ही तेरावी फूल मॅरेथॉन आहे.
या वयातही ते एककम फिट असून त्यांना वयाच्या ८५ व्या वर्षी ना कोणता आजार जडला आहेत, ना कोणती औषधं सुरु आहेत. जनार्दन यांनी आतापर्यंत अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे.
१३ फूल मॅरेथॉन, ५४ हाफ मॅरेथॉन, ९ अल्ट्रा वन मॅरेथॉन, म्हणजे ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या मॅरेथॉनमध्ये ते धावले आहेत.
७२ व्या वर्षी मॅरेथॉन
विशेष म्हणजे ते वयाच्या ७२ व्या वर्षी पहिली फुल मॅरेथॉन धावले. त्यानंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा सपाटाच लावला. दुबई, सिडनी मॅरेथॉनमध्येही ते सहभागी झाले आहेत.
ते यावेळी आठव्यांदा मुंबई फुल मॅरेथॉन धावणार आहेत.
सायकलिंगची आवड
रेल्वेमध्ये अधिकार पदावर काम केलेल्या जनार्दन वयाच्या ६२ व्या वर्षी अचानक बेशुध्द झाले. तोपर्यंत ते कोणताही शारीरिक व्यायम करत नसत.
काही महीने त्यांनी औषध घेतली आणि मग त्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी सुरुवातीला ७७ किलोमीटर सायकल चालवली.
यानंतर ते आजतागायत कित्येक किलोमीटर साइकिलिंग करतात.
अजून १० वर्षे धावणार
याखेरीज त्यांनी जवळपास २० ट्रेक केले आहेत. यातील काही ट्रेक हे हिमालयतही केलेत है विशेष.
याशिवाय सायकिलिंग, शॅथॉलॉन, डेझर्ट सायकलिंग, व्हर्टिकल रन म्हणजे आधी सायकलिंग आणि मग धावत पायऱ्या चढणे यातही ते सहभागी होत असतात.
आपण अजून दहा वर्ष सहज धावू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.