कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांना रविवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 10 सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 


गेल्या काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचं कोरोनामुळे निधन झाल होतं. सुनिल कदम असं त्यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भावाच्या आठवणीत ट्विटरवर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती. 


भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत मोठ्या संख्येने वाढते आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांवर गेली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 82 हजार 203 इतकी झाली आहे.


गेल्या काही दिवसांत नितीन राऊत, सुधीर मुनगंटीवार, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नवनीत राणा यांनादेखील कोरोनाची लागण झाली.