मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. यावृत्ताला महापौर कार्यालयातूनही दुजोरा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार किशोरी पेडणेकर यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांच्या प्रकृती संदर्भातील अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. किशोरी पेडणेकर यांची तब्येत लवकर सुधारावी म्हणून सर्वजण प्रार्थना करत आहेत. 



मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. तर काही भागांत दरड कोसळली आहे. मुंबईमध्ये 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.