मुंबई : रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेगाब्लॉक कुठून, कसा, किती वाजता?


मध्य रेल्वे (अप मार्ग)


मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर. त्यामुळे त्यामुळे अप फास्ट मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावर वळविण्यात येणार. मेगाब्लॉकदरम्यान लोकल सुमारे 20 मिनिटं उशिराने धावणार.


मध्य रेल्वे (डाऊन मार्ग)


सीएसएमटीहून सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या कालावधीत लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावर थांबा घेतील. मेगाब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन दिशेकडील लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावणार. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसवरही मेगाब्लॉकचा परिणाम. सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत मेल-एक्स्प्रेस धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.


पश्चिम रेल्वे


बोरीवली ते नायगाव स्थानकामध्ये सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर जम्बो ब्लॉक. ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल विरार-वसई ते बोरीवलीपर्यंत अप स्लो मार्गावरून धावतील.


हार्बर-ट्रान्स हार्बर


ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक रद्द. त्यामुळे प्रवाशांना दिलासा.