रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 4:15पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील.
या मार्गावर मेगाब्लॉक
तर हार्बरवर नेरुळ ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकदरम्यान नेरूळ ते पनवेलदरम्यानची दोन्ही मार्गांवरील वाहतूक या काळात बंद असेल. ट्रान्स हार्बरवरील वाहतूकदेखील नेरूळ ते पनवेलदरम्यान बंद असेल.
काही मार्गावरील रेल्वे सेवा रद्द
पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी 10:35 ते दुपारी3:35 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. यादरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत..