आज महामुंबईत मेगाब्लॉक! मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की पाहा!
Railway Megablock : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (आज) हा ब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Railway Mega Block on 11 September : गणेशोत्सव काळात रेल्वेकडून मेगाब्लॉक (megablock) रद्द करण्यात आला होता. मात्र आज (रविवारी) मुंबईकरांनो (mumbaikar) घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल लोकलचे (mumbai local) वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. कारण आज लोकल मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (mumbai megablock on central and harbour railway routes)
रेल्वे (railway) रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य (central railway) आणि हार्बर मार्गावर (harbour railway) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर (western railway) ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वे (मेन लाईन)
माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन लोकल मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत
ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मध्य रेल्वे (हार्बर लाईन)
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/ नेरुळ - खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.