Mumbai Metro Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना घडलेल्या घटनांचे मजेदार किस्से या व्हायरल व्हिडीओतून समोर येतात. लोकल ट्रेनमधील गर्दी, भांडणं आणि त्यासंदर्भातील अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहे. आता लोकलप्रमाणेच मुंबई मेट्रोचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही क्लिप तीन वर्षे जुनी असून मुंबईतील मरोळ नाका मेट्रो स्टेशनवर (Marol Naka Metro Station) शूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनप्रमाणे मेट्रोमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला यशही मिळतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 12 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिना खोलकर या ट्विटर अकाउंटवरून 12 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर 'मरोळ...तीन वर्षापूर्वी', अशी कॅप्शन देण्यात आली आहे.  गुलाबी शर्ट घातलेला एक माणूस मेट्रोच्या खचाखच भरलेल्या डब्यात स्वत:साठी जागा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मेट्रोमध्ये उपलब्ध असलेल्या कमी जागेत स्वत:ला अॅडजस्ट करतो. जाग नसल्याने बाहेर पडतो आणि गेट बंद होण्याच्या काही सेकंद आधी डब्ब्यात पुन्हा घुसतो. गर्दीने भरलेल्या मेट्रोत तो यशस्वीरित्या जागा मिळवतो. व्हिडीओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 200 लाईक्स मिळाले आहेत



एका यूजरने लिहिले की, 'मुंबई मेट्रोचा प्रवास मुंबई लोकलपेक्षा वाईट होत आहे'. दुसर्‍या यूजर्सने लिहिलं आहे की, 'मुंबईप्रमाणेच आमच्या जीवनात अडजस्ट करणं महत्त्वाचं आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'लोकांची चेष्टा करणे थांबवा. हा मुंबईकरांचा दिनक्रम आहे.' तर चौथ्या युजर्सने मजेशीर कमेंट्स केली की, 'मुंबईत प्रत्येकासाठी अशी जागा आहे'.