मुंबई महानगर प्रदेशात १ लाख २० हजार फ्लॅट्स विक्रीविना पडून
जून २०१८ पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात १ लाख २० हजार फ्लॅटस विक्रीविना पडून आहेत.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात स्वतःच हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न. मात्र गगनाला भिडलेल्या घरांच्या किंमती, घराच्या गुंतवणुकीतून सध्या अपेक्षित न मिळणारा परतावा यामुळे अनेक फ्लॅटस विक्री विना पडून आहेत. मालमत्ता सल्लागार कंपनी नाईट फ्रँकच्या सर्वेनुसार जून २०१८ पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात १ लाख २० हजार फ्लॅटस विक्रीविना पडून आहेत.
कुठे किती विनाविक्रीचे फ्लॅट्स ?
-दक्षिण मुंबईत १०२४
-मध्य मुंबईत ४७८०
-मुंबई पश्चिम उपनगर १९,११२
-मुंबई पूर्व उपनगर २१,६७९
-नवी मुंबई,पनवेल २१,६७९
-ठाणे १४,१५२
-डोंबिवली-कल्याण-भिवंडी पट्ट्यात २२,९१२
-वसई विरार पट्ट्यात १४,५३०
किंमती आवाक्यात कधी येणार ?
गेल्या काही वर्षात मुंबई शहर उपनगर,ठाणे,नवी मुंबई,पनवेल, वसई विरार,कल्याण,डोंबिवली या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम झालंय. काही ठिकाणी अद्याप ही अनेक मोठ्या प्रकल्पांच काम सुरू आहे. एकीकडे अशी परिस्थिती असली तर ही बांधकाम व्यवसायातली मंदावलेली स्थिती लवकर सुधारावी अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांना आहे.
घर रिकामी पडून राहण्यामागे घरांच्या फुगवलेल्या किंमती गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचा अपेक्षा ही देखील कारण आहेत. घरांच्या किमती आवाक्यात येत नाहीत तो पर्यंत परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.