मुंबई : मुंबई मेट्रोचे घाटकोपरमध्ये तीन-तेरा वाजले आहेत, घाटकोपरलाही जास्त गर्दीमुळे तिकिट विक्री बंद करण्यात आली, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी स्टेशनवर रख़डले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आज गर्दीते कोंबल्यासारखा प्रवास करावा लागला आहे.


सुरूवातीला अंधेरी ते वर्सोवा दरम्यानची मेट्रो वाहतूक काही वेळ बंद असल्याने हा गोंधळ झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, यामुळे ट्रेन येण्यास उशीर झाला आणि प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढत असल्याने तिकीट विक्री बंद करण्यात आली.


ऑफिसच्या वेळेत हा गोंधळ उडाल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली, यानंतर काही वेळाने मेट्रोची वाहतूक सुरळीत होत आहे. सध्या पुन्हा मेट्रोची वाहतूक सुरळीत होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


एकंदरीत मेट्रोही वाहतुकीच्या गोंधळातून सुटत नाही असं स्पष्ट झालंय, पण मेट्रोच्या महागड्या तिकिटीच्या मानाने हे संतापजनकच म्हणावं लागेल.