राजू शेट्टी झाले मुंबईकर, स्वप्ननगरीत खासदार कोट्यातून म्हाडाचं घर... जाणून घ्या घराची किंमत
MHADA Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थात म्हाडाने मुंबईतल्या 2030 घरांसाठी सोडत काढली. यात खासदार कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांनाही घर लागलं आहे.
MHADA Lottery 2024 : स्वप्ननगरी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यापैकीत 2030 लोकांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थात म्हाडाने मुंबईतल्या 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली. यात काही मराठी कलाकार (Marathi artists) आणि लोकप्रतिनिधींनाही घरं लागली आहे. हातकणंगले मतदार संघाचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांचंही मुंबईतल्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून मुंबईत घर (Mhada Home) लागलं आहे.
कुठे आणि घराची किंमत किती?
म्हाडाच्या 2030 घरांसाठी एकूण 1 लाख 13 हजार लोकांनी अर्ज केले होते. यातल्या 2030 भाग्यवान लोकं ठरली आहेत. ज्या लोकांना मुंबईत घरं लागली नाहीत, त्यांनीही नाराज होण्यची गरज नाही. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यंनी लवकरच आणखी एक लॉटरी जाहीर केली जाणार असल्याची खुशखबर दिली आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून घरासाठी अर्ज केला होता. या कोट्यात तीन घरं उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण राजू शेट्टी यांचा एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीची घोषणा होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांच्या घराचं स्वपू पूर्ण झालं होतं. मंगळवारी याची औपचारिक घोषणा करण्यात आली.
राजू शेट्टी झाले मुंबईकर
म्हाडाचं घर लागल्याने राजू शेट्टी आता मुंबईकर होणार आहेत. मुंबईतल्या पवई भागात राजू शेट्टींचं घर आहे. या घराची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. आपली आणि कोल्हापूरातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांची राहण्याची सोय होणार असल्याचा आनंद अधिक आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
मराठी कलाकारांनीही घर
याशिवाय कलाकार कोट्यातून अभिनेत्री गौतमी देशपांडे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे आणि निखिल बने तसंच मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांनाही घरं लागली आहेत. मुंबईतल्या विक्रोळी इथल्या कन्नमवार नगरममध्ये निखिल बनेला घर लागलं आहे. तर पवई परिरसातील उच्चभ्रू गटात गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना घरं लागली आहेत. या घरांची किंमत 1 कोटी 80 लाख इतकी आहे.
गोरेगावमधील दोन घरांसाठी एकूण 27 कलाकारांनी अर्ज केलं होते. यापैकी एक घर माझा होशील ना मालिका फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला मिळालं आहे.