मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. सीएसएमटीवरुन एकही लोकल रवाना झालेली नाही, पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. प्रवाशी संतप्त आहे. त्यातच आता मुंबईची मोनो रेल्वे ही विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकाजवळ मोनो रेल्वे थांबवण्यात आली आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग बंद असल्याने अनेक जणांकडे मोनोचा पर्याय होता. पण आता हा मार्ग ही बंद विस्कळीत झाला आहे. एका मोनो स्थानकावरुन एका रेल्वेसाठी फक्त 50 प्रवाशांना तिकीट दिलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोअर परेल येथून सायंकाळी ६.४५ वा. मोनो सुटली. लोकांनी ३ ते ५ तास रांगेत उभे राहून तिकीट काढलीत. खूप गर्दी असल्यामुळे जास्त प्रवासी मोनोत चढलेत. मोनो वडाळा डेपो जवळ आली असता बंद पडली. जवळ एक तास एकाच ठिकाणी उभी होती. एसी बंद होता. सगळ्यांना घाम फुटला. महिला पँनिक झाल्या होत्या. एक तासाने सगळ्यांना एकाच बाजूला लोड करायला सांगितले. मोनो एका वळणावर एकाच बाजूला कळलंडली होती. त्यामुळे प्रवासी खूप घाबरले होते. त्यानंतर मोनो मागे आणली. भक्ती पार्क येथे आणली.


 रेल्वेकडून कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात येत नाही आहे. सकाळपासून बाहेर पडलेले चाकरमानी रेल्वे स्थानकावर अडकून पडले आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला. लोकल सेवा कधी सुरु होईल याची माहिती दिली जात नसल्याने प्रवाशी आता संताप व्यक्त करत आहेत. रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढत चालली आहे.