मुंबई : मोनोरेलमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ मोनोरेलच्या मागच्या डब्याला आग लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाची गोष्ट म्हणजे ही मोनोरेल स्थानकावर पहाटे उभी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमुळे मोनोरेलची सेवा ठप्प झाली असून चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.



मैसूर कॉलनी स्टेशनवर मोनोरेल उभी असताना आज सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. या ट्रेनच्या मागच्या डब्याला अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ३० मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


आगीत कोणीही जखमी झालं नसल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं. पहाटेची वेळ असल्याने मोनोरेलला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सूत्रांनी सांगितलं. या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी या मार्गावरून कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.