मुंबई मोनो : स्कोमी कंपनीला एमएमआरडीएचा जोरदार दणका
स्कोमी कंपनीची दिरंगाई एमएमआरडीएला भोवली. त्यामुळे मोनोचे काम काढून घेण्यात आलेय.
मुंबई : शहरात मोनोच्या माध्यमातून दळणवळणाचे जाळे उभारण्यातवर भर देण्यात आला. मात्र, मोनो रेलला गती आलेली नाही. मोनोच्या फसलेल्या प्रयोगानंतर आता एमएमआरडीएने कारवाईला सुरूवात केली आहे. व्यवस्थापन आणि देखभालीचं काम स्कोमी या कंपनीकडून काढून घेण्यात आलंय. यापुढे हे काम एमएमआरडीएच सांभाळणार आहे.
स्कोमी कंपनीची दिरंगाई एमएमआरडीएला भोवली. २०१४ साली मोनोचा पहिला टप्पा सुरू झाल्यावर सेवेत सातत्याने अडथले आले. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणे, ढिसाळ कारभार यामुळे हे काम स्कोमीकडून काढून घेण्यात आलंय. वडाळा ते सातरस्ता हा मोनोचा दुसरा टप्पा एप्रिलपर्यंत सुरू होणार आहे.
मोनोच्या ऑपरेशन आणि मेन्टेनेन्सचे काम एमएमआरडीएने स्कोमी कंपनीकडून काढून घेतले आहे. एमएमआरडीए यापुढे हे काम पाहणार आहे. 2008 ला स्कोमी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. 2014 ला मोनोच्या पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा सुरू झाला पण सातत्याने मोनोच्या सेवेत अडथळे आले. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणे आणि ढिसाळ कारभार यामुळे स्कोमीकडून हे काम काढून घेण्यात आले आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली