मुंबई : मुंबईतील कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर रुफटॉप हॉटेल, पब आणि इतरही रेस्टॉरंटमधील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या अग्निकांडाचे पडसाद थेट संसदेतही उमटल्याचं पहायला मिळालं. 


दरम्यान, या अग्निकांडाबाबत मोजो रेस्टॉरंटनं काय खुलासा केलाय, ते पाहूयात...


मोजो रेस्टॉरंटचा खुलासा


  • सगळे सुखरूप बाहेर पडले

  • या घटनेमुळं आम्हाला प्रचंड दुःख झालंय

  • आमच्या स्टाफला आगीचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं

  • आमच्या जागेत कुठंही सिलेंडर ठेवलेले नव्हते

  • मोजोनं अग्निशमन नियमांचं पालन केलं होतं. तशी प्रमाणपत्रेही आहेत

  • आग लागल्यानंतर सगळ्या पाहुण्यांना त्यांनी सुखरूप बाहेर काढलं


तर वन अबोव्ह रेस्टॉरंटनं या अग्निकांडाबाबत काय खुलासा केलाय, ते पाहूया...


वन अबोव्हचा खुलासा


  • 'आम्ही पाहुण्यांना बाहेर काढलं'

  • 1 अबोव्ह शेजारच्या भागातून आगीचे लोळ येत असल्याचं आम्ही पाहिलं.

  • मोजो बिस्त्रोमधून बाहेर पडायला काहीच मार्ग नसावा.

  • आम्ही देखील आगीसाठीच्या सगळ्या नियमांचं पालन केलंय.

  • आग नियंत्रणाबाहेरची असल्यानं आम्ही सगळ्या पाहुण्यांना बाहेर काढलं.

  • त्यामुळे त्यांचे पाहुणे देखील बाहेर पडायला आमच्या जागेत आले.