Mukesh Ambani Threat : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 19 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. अंबानी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तेलंगणामधून (Telangana) आरोपीला अटक केली असून गणेश रमेश वनपारधी असं आरोपीचं नाव आहे. आरोपी वनपारधीने शादाब खान नावाने अंबानी यांना मेल पाठवला होता. या ईमेलमध्ये आधी 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. नंतर यात वाढ करुन 400 कोटी रुपये करण्यात आली. खंडणीचे असे पाच ते सहा ईमेल आरोपीने पाठवले होते. याआधी पाठवण्यात आलेले ईमेसाठी वीपीएन नेटवर्कचा वापर करण्यात आला होता, आणि याचा पत्ता बेल्जियमचा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 ऑक्टोबरला पहिली धमकी
एशियातले सर्वात श्रीमंत आणि जगातल्या टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर 27 ऑक्टोबरला धमकीचा पहिला ईमेल आला होता. या ईमेलमध्ये 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 28 ऑक्टोबरला धमकीचा दुसरा ईमेल पाठवण्यात आला. पण यात खंडणीची रक्कम वाढवून दोनशे कोटी रुपये करण्यात आली. दुसऱ्या ईमेलच्या तीन दिवसांनंतर म्हणजे 30 ऑक्टोबरला पाठवण्यात आला. यात खंडणीची रक्कम थेट 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. एकामागोमाग एक धमकीचे ईमेल आल्याने पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं. 


मुंबई पोलिसांसमोर आव्हान
उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देण्याचा हा पहिला प्रकार नाहीए. याआधीही अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. पण यावेळी आरोपीने एकामागोमाग एक ईमेल पाठवत खंडणीची रक्कम वाढवत नेली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला. 


'माझ्याकडे चांगले शुटर्स आहेत'
उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. यात लिहिलं होतं, 'If you don’t give us 20 crore rupees, we will kill you, we have the best shooters in India.' म्हणजे तूम्ही खंडणी दिली नाही तर जीवे मारले जाल, आमच्याकडे भारतातले चांगले शुटर्स आहेत. यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आरोपीविरोधात कलम 387 आणि 506(2) अंतर्गत खंडणी वसूली करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


मुंबई पोलिसांनी लावला शोध
मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा वेगाने तपास सुरु केला. शादाब खान या नावाने धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस शोधून काढला. प्रत्यक्षात हे ईमेल तेलंगनामध्ये बसून गणेश रमेश वनपारधी नावाचा एकोणीस वर्षांचा तरुण पाठवत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी तेलगणात जाऊन आरोपीला अटक केली आहे.  आरोपी गणेशला  8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.