मुंबई : मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांना साडे चौदा हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. पालिकेतल्या १ लाख १० हजार कर्मचा-यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. या दिवाळी बोनससाठी महानगरपालिका १६० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याचवेळी पालिका अनुदानित खासगी शाळेतल्या शिक्षकांना सव्वा सात हजार रूपये दिवाळी बोनस रुपात मिळणार आहेत. महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी ही घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मुंबई महानगरपालिकेचाच उपक्रम असलेल्या बेस्टच्या कर्मचा-यांना, यंदा दिवाळी बोनस मिळणार नसल्याचं संकेत मिळत आहेत.