मुंबई : Raj Thackeray active for Mumbai Municipal Corporation Election : आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. मुंबई विधानसभा निहाय राज ठाकरे स्वतः आढावा घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थिती तसेच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी या सर्वांचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.



 मनसे आणि भाजपची मैत्री


दरम्यान, दुसरीकडे आता बातमी आहे मनसे आणि भाजपच्या मैत्रीची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढत चालली आहे. भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी शिवतीर्थवर वाढल्याचं दिसून येत आहे. आज घाटकोपर पूर्वचे भाजपचे आमदार पराग शहांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नसून, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितले. पण, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत मनसे आल्यास आनंद होईल, असं शहा म्हणाले.