मुंबईकरांसाठी गुडन्यूज, नो पार्किंग दंडात मोठी कपात
मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करणाऱ्यांचा दंड दहा हजार रुपयांवरुन कमी करुन एक हजार रुपये करण्यात आला आहे. नो पार्किंगचा दंडाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याने नो पार्किंग दंड याआधी चक्क माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही भरावा लागला होता. काहींही या दंडाविरोधात निदर्शनेही केली होती. हा दंड कमी केल्याने मुंबईकरांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
मुंबई पालिकेकडून रस्त्यावर तसेच सोसायटीच्या बाहेरील रस्त्यावर पार्क केल्या गाड्यांवर कारवाई केली होती. बेकायदा गाडी पार्क केलेल्यांकडून १० हजार रुपयांच्या दंडा वसुली करण्यात आली होती. याबाबत मुंबईकरांमध्ये नाराजी होती. महापालिकेने हा निर्णय घेऊन मुंबईकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेने दंडाची रक्कम कमी केली असली तरी पार्किंगचे नियम पाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या 'नो पार्किंग' कारवाईविराधात राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मुंबईत आंदोलन करण्यात आले होते. पार्किंगच्या निर्णयाबाबत अनेक राजकीय पक्षातून नाराजी व्यक्त होत होती.