मुंबई : Narayan Rane and Nitesh Rane News : अभिनेता सुशांत राजपूतची मॅनेजर दिशा सालीयन (Disha Salian case) प्रकरणात भाजपचे केंदीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा मालवणी पोलिसांनी काल तब्बल नऊ तास जबाब नोंदवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) आणि नारायण राणे वादाचा नवा अंक सुरु झाला आहे.  मुंबई महापालिकेकडून (BMC Officers) नारायण राणे यांच्या (Narayan Rane) जुहू इथल्या अधीश बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यात आलं होतं.


या बंगल्याचे बांधकाम सिआरझेडचे (CRZ) उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबई महापालिकेचं पथक राणे यांच्या बंगल्यावर धडकलं होतं. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. 


जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं नमूद करत मुंबई महापालिकेने ही नोटीस काढली असून सात दिवसात आपलं म्हणणं सादर करा असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.


महापालिकेच्या पथकाला नारायण राणे यांच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.