मुंबई :  बीएमसी कोविड घोटाळ्यासंदर्भात (BMC Covid Scam) मोठी बातमी समोर आली आहे.  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईत मृत कोविड रूग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग (Bodybag) 2000 रूपयांऐवजी 6800 रूपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलंय. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचं ईडीने म्हटलंय. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच महापौर होत्या.  21 जूनला ईडीने राज्यभर छापे मारले. या छाप्यात 68 लाख 65 हजार रूपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आलीय. या शिवाय 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईएडीला आढळली आहे. 21 जूनला ईडीने उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह 10 ते 15 जणांवर छापे मारले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार?
कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं ईडीचं (ED) म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून समन्स बजावलं जाऊ शकतं. 


ठाकरे गटाला धक्का
दुसरीकडे, ईडीने उद्धव ठाकरेंचा निकटवर्तीय सूरज चव्हाणला चौकशीला उपस्थित राहण्याचं समन्स बजावलंय. याशिवाय आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांनाही काल चौकशीला उपस्थित राहण्याचं ईडीचं समन्स होतं. मात्र ते अनुपस्थित राहीले. आता जयस्वाल यांनी 4 दिवसांची मुदत मागितली आहे. लवकरच ईडी डॉ. हरिदास राठोड, रमाकांत बिरादार आणि इतरांना चौकशीला बोलवून त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल. दरम्यान, कोव्हिड घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यशवंत जाधव यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? केवळ शिंदे गटात असल्यामुळेच त्यांना अभय दिलं जात आहे काय? असे प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. 


गृहमंत्र्यांनी दिला इशारा
प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे वाचणार नाहीत असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय. कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशी होणारच असं ते म्हणाले. तर, ईडी कारवाई हे सूडाचं नाही असुडाचं राजकारण आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय लोक जीव वाचवायचा प्रयत्न करताना तुमचे लोक टेंडरचे प्रयत्न करत होते. त्यामुळे आता हे आसूड उठणारच असं शेलार यांनी सुनावलंय. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे वाचणार नाहीत असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय. कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशी होणारच असं ते म्हणाले.