`धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को` आमदार झिशान सिद्दीकी यांची पोस्ट चर्चेत
Zeeshan Siddique Post : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती चर्चेत आहे.
Zeeshan Siddique Post : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर (Baba Siddique Murder Case) त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये झिन सिद्दीकी यांनी 'बुज़दिल डराया करते है अक्सर दिलेर को, धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को...' असं लिहिलं आहे. याआधीही झिशान सिद्दीकी यांनी आपले वडिलांनी गोरगरीब-निर्दोष लोकांची रक्षा करताना आपला जीव गमावला. माझ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. पण वडिलांच्या मृत्यूचं राजकारण करु नका, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये मला आणि कुटुंबाला न्याय मिळालया हवा असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं होतं.
झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawarence Bishnoi Gang) घेतली आहे. 12 ऑक्टोबरला वांद्रे इथल्या झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
आरोपींच्या मोबाईलमध्ये झिशानचा फोटो
दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका आरोपीच्या मोबाईलमध्ये आमदार झिशान सद्दीकी यांचा फोटो आढळला आहे. याप्रकरणातील मास्टरमाईंडने स्नॅपचॅटच्या माध्यमातून झिशान सिद्दीकी यांचा फोटो शूटर्सबरोबर शेअर केला होता. शूटर्स आणि मास्टरमाईंडने या अॅपचा वापर करत एकमेकांशी संवाद साधला होता. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले जात असताना आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णलयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली. गँगमधल्या एका सदस्याने फेसबुक पोस्टही केली होती. यात त्याने म्हटलं होतं, सलमान खान याच्याशी जवळीक असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. काळवीट शिकारप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी हल्ल्यातल्या दोन शुटर्सना अटक करण्यात आली आहे. तर पुणे, अम्बरनाथ आणि डोंबिवली इथून इतरांची धरपकड करण्यात आलीय.