Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचा आणखी एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Footage) समोर आलाय. रविवारी सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी वांद्रेतल्या सलमान खानच्या (Salman Khan) गॅलक्सी अपार्टमेंटवर (Galaxy Apartment) गोळीबार करण्यात आला होता. चार राऊंड फायर करुन हल्लेखोर पसार झाले होते. एक गोळी गॅलरीतून घरात शिरली तर एक इमारतीच्या भिंतीवर आदळली होती. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक जीवंत काडतूसही जप्त केलं होतं. सलमान खान फायरिंग प्रकारचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 4 विशेष पथकं नेमली आहेत. तर स्थानिक पोलिसांनीही 2 खास पथकं तयार केली आहेत. अशा प्रकारे एकंदर 6 विशेष पथकं या वलयांकित गोळीबार प्रकरणाचा तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत रचला गेला कट
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराचा कट रचला गेला तो अमेरिकेत. व्हर्च्युअल नंबरवरून गोळीबार करणाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. रोहित गोदाराच्या (Rohit Godara) सांगण्यावरून शूटर्ससाठी शस्त्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती सूत्रांनी दिलीय. जवळपास एक महिन्यांपासून आरोपींचं प्लॅनिंग सुरु होतं. अनमोल बिश्नोईने रोहित गोदाराला त्याची जबाबदारी दिली होती. रोहित गोदारा हा लॉरेन्स टोळीशी संबंधित आहे. त्याच्या आदेशानेच गोळीबार करण्यात आला...


'त्या' अर्ध्या तासात काय घडलं? 
14 एप्रिलला रविवारी पहाटे 3 वा. आरोपी सलमानच्या घराजवळ पोहचले. 4.50 वा. बाईकस्वार आरोपींनी फायरिंग केली. एकूण 5 राऊंड फायर केल्या गेल्या. ज्यापैकी एक गोळी सलमानच्या बाल्कनीतून घरात गेली. एक गोळी भिंतीवर लागली. एक जिवंत काडतूस घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलं आहे. फायरिंग करुन आरोपी मेहबूब स्टुडिओजवळ गेले. तिथे रिक्षावाल्यांना वसई जाण्याचा रस्ता विचारला. आरोपी वांद्र्यातील माऊंट मेरी चर्चच्या दिशेनं गेले आणि तिथेच बाईक सोडली. पुढे वांद्रे स्टेशनवर आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले. वाजून 13 मिनिटांनी ते सांताक्रुझ प्लॅटफॉर्म नंबर 5 वर दिसले. सांताक्रुझ स्टेशनवरुन वाकोल्याच्या दिशेनं बाहेर येत रिक्षा पकडली. विशाल उर्फ कालू अशी एका आरोपीची ओळख पटलीय. तो गुरुग्राममधील गँगस्टर रोहित गोदारासाठी काम करतो



एका आरोपीची ओळख पटली
विशाल उर्फ कालू यानेच गोळी झाडल्याचा संशय आहे. आरोपींनी वापरलेली बाईक सेकंड हँड असून ती रायगड पासिंगची आहे. पोलिसांनी आता ही बाईक जप्त केलीय. या बाईकचा पहिला मालक कोण आहे, त्यानं ही बाईक आरोपींना कशी विकली, व्यवहारात कुणी मध्यस्थ होता का याचा पोलिस शोध घेतायत. दोन्ही आरोपी बाहेरच्या राज्यातले असल्यामुळे बाईक खरेदी व्यवहारात आणखी काही जण गुंतले असण्याचा संशय पोलिसांना आहे. गोळीबारानंतर फरार झालेल्या शूटर्सचा पाच राज्यांचे पोलीस शोध घेतायत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबच्या पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 विशेष पथकं नेमली आहेत. तर स्थानिक पोलिसांनीही 2 खास पथकं तयार केली आहेत.