Water cut in Mumbai : आधीच उकाड्याने मुंबईकर हैराण असताना आता मुंबईकरांवर पाणीकपतीचं संकट ओढवलंय. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरात येत्या गुरुवार 30 मेपासून 5 टक्के पाणीकपात होणार आहे. हवामान विभागानुसार गेल्या दोन वर्षात म्हणजे 2021 आणि 2022 मध्ये मान्सून हा 15 ऑक्टोबरपर्यंत सक्रीय झाला होता. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेते हवा तसा पाऊस झाला नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणारा धरण्यात सुमारे 5.64 टक्के पाणीसाठी कमी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. 


मुंबईकर पाणी जपून वापरा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसर करण्याच आवाहन मुंबई महापालिकेने केलंय. त्याशिवाय पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, असा सल्ला दिला आहे. 


आवश्यक तितकंच पाणी पेल्यामध्ये प्यावं. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ करा. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा. 


घरकामं करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका आणि त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामं करा. 


वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसा. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसा. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढं कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी करा. 


उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.


एकूणच, पाणी बचतीच्या उपाययोजना अंगीकारणे सहज शक्य आहे. त्याचा अवलंब करुन मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय. 


या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार!


मालाड पश्चिम भागात सोमवारी 27 आणि मंगळवारी 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारण्यासाठी काम हातात घेण्यात आलंय. त्यामुळे सोमवारी 27 मे रोजी रात्री 10 पासून तर मंगळवारी 28 मे रोजी रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. दोन दिवस पाणी नसल्याने नागरिकांनी एक दिवस पाणी पुरेल असा साठा करून ठेवा असं आवाहन करण्यात आलंय.