धक्कादायक! मुंबईत इमारतीच्या सातव्या मजल्यावर सापडला कोब्रा साप
Mumbai News : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील एका इमारतीमध्ये कोब्रा सापाचे पिल्लं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बऱ्याच तासांच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांना या क्रोब्राच्या पिल्लाला पकडण्यात यश आले आहे.
Mumbai News : गोरेगावमधील (Goregaon News) एका निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एक कोब्रा सापाचे (cobra snake) पिल्लू सापडलं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव संघटनेच्या सदस्यांनी त्याची सुरक्षित ठिकाणी सुटका केली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वीसुद्धा एका बंद इमारतीमध्ये चार फूट लांब साप आढळल्याने खळबळ उडाली होती. मंगळवारी दुपारी रॉयल पाम्स हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये हे सापाचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफला संघटनेला संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रॉयल पाम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये धाव घेतली आणि कोब्राचे पिल्लू नैसर्गिक अधिवासात सोडलं.
'RAWW च्या पथकाला या घटनेच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि घाबरलेल्या रहिवाशांना मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते,' असे , RAWW चे संस्थापक-अध्यक्ष आणइ महाराष्ट्र वन विभागाचे मानद वन्यजीव कर्मचारी पवन शर्मा यांनी म्हटलं.
अनेक तास शोध घेतल्यानंतरही बचाव पथकाला कोब्रा सापडला नव्हता. त्यानंतर फ्लॅट मालकांना सतर्क राहण्यास सांगितले आणि पुन्हा कोब्रा दिसल्यास RAWWशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर रात्री घराच्या किचन प्लॅटफॉर्मवर विषारी कोब्रा साप पुन्हा दिसला. त्यानंतर पुन्हा बचाव पथकाला बोलवण्यात आले आणि अखेरीस त्याची सुटका झाली, असे पवन शर्मा यांनी सांगितले. त्यानंतर सापाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तो तंदुरुस्त आढळल्यानंतर त्याला वनविभागाच्या समन्वयाने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आणखी एका इमारतीमध्ये सापडला साप
काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील इमारतीच्या 13व्या मजल्यावर चार फूट लांब अजगर आढळ्याने खळबळ उडाली होती. इमारतीच्या 13व्या मजल्यावर अजगर कसा पोहोचला हे कोणालाच समजू शकलेले नाही. इमारतीत अजगर दिसताच त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने 13व्या मजल्यावर पोहोचून अजगराची सुटका केली. आयटी कंपनीत काम करणारे प्राणी कार्यकर्ते सूरज साहा यांनी माध्यमांना सांगितले की, 'घाटकोपर पश्चिमेकडील एलबीएस रोडवरील व्रिज पॅराडाईज इमारतीच्या टेरेसवर अजगर दिसला. ओल्या सिमेंटने अजगर भरला होता. इमारतीच्या छतावर बांधकाम सुरू असतानाच तो तिथे पोहोचला. आम्ही तातडीने राज्याच्या वनविभागाला याची माहिती दिली जेणेकरून त्याची सुटका करता येईल.'
त्यानंतर अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मुंबई परिक्षेत्राचे वन अधिकारी राकेश भोईर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर अजगराला सुरक्षितरित्या वाचवून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.