Mumbai Slum Dwellers Free Homes: आपलं स्वत:चं घर (house) असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं.  पण वाढलेल्या महागाई आणि घरांच्या वाढलेल्या किंमतीमुळे अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं नाही. सर्वसामान्यांचं हे स्वप्न होण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना रावबल्या जातात. म्हाडा (MHADA ) आणि सिडको (CIDCO) या योजनांमध्ये सर्वसामान्यांना कमी किंमतीत घरं मिळतात. म्हणून म्हाडा आणि सिकडो लॉटरीकडे सर्व सामान्यांच्या नजरा लागलेल्या असतात. सिडको लॉटरी 2023 (CIDCO Lottery) जानेवारी महिन्यात येणार आहेत. अशात मुंबईतील (Mumbai News) झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे...



झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील झोपडीधारकांना राज्य सरकारकडून गुडन्यूज मिळण्याची शक्यताय...पहिला मजला किंवा पोटमाळ्यावरील फोटोपासधारक झोपडीधारकांना मोफत घर मिळण्याची शक्यताय. याबाबतचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय. झोपडीधारकांना राहत असलेल्या ठिकाणी मोफत घर उपलब्ध नसल्यास इतर योजनांमधील घरे उपलब्ध करावीत असाही प्रस्ताव आहे. हा निर्णय मंजूर झाला तर आगामी पालिका निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो. झोपडीधारकांसाठी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मागणी केली होती. आता राज्य सरकार हा प्रस्ताव मंजूर करणार का...? याकडे लक्ष लागलंय.  (mumbai news big news for slum rehabilitation Free houses for slum dwellers from Chief Minister Eknath Shinde Govt)



मोफत घरांसाठी कोण पात्र ठरू शकतं? 


चाळीमध्ये पहिल्या मजल्यावर स्वतंत्रपणे राहणारे आणि फोटोपास असलेलं कुटुंबांना फायदा


या घराला स्वतंत्र दरवाजा, विद्युत आणि पाणी जोडणी आवश्यक 


1985 पर्यंतच्या झोपडीधारक पात्र


सर्वच पहिल्या किंवा पोटमजल्यावरील रहिवाशांना लाभ


सिडकोच्या नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ 


नवी मुंबई नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे, सिडकोने सामुहिक गृहनिर्माण योजना दिवाळी - 2022 साठी ऑनलाइन नोंदणीसाठी 6 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.


ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट 7 जानेवारीपर्यंत करता येईल.


स्वीकृत अर्जदारांची मसुदा यादी 14 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी 18 जानेवारी 2023 रोजी सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/ या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. योजनेसाठी संगणकीकृत सोडती 3 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.