मुंबई (मालाड) : आपल्या पैकी कोणाला केक खायला आवडत नाही? कोणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणाच्या आयुष्याची चांगली सुरवात म्हणून आपण केके कापतो आणि आपला आनंद साजरा करतो. आपण हा केक आवडीने खातो सुद्धा. परंतु आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण तुम्ही खात असलेला केक नशेचा केक असू शकतो, त्यामुळे आत्ताच सावध व्हा. या केकमध्ये ड्रग्ज असू शकतो, कारण असा एक प्रकार मुंबईमधील मालाड भागातून समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''द बेक्स बेकर''असं या बेकरीचं नाव आहे. या बेकरीमध्ये केकमध्ये ड्रग्ज मिसळून हायप्रोफाईल लोकांना त्याची विक्री केली जात होती. मुंबईतल्या मालाड भागात एका बेकरीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापा मारत या ड्रग्जच्या बेकरीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एनसीबीनं एका महिलेसह तीन जणांना अटक केली केली आहे. ऍलेस्टेन फर्नांडीस आणि जगत चौरसिया अशी आरोपींची नावं आहेत. त्यांची नार्कोटिक्स ब्युरोकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.



बेकरीमधून ड्रग्जचं रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या रॅकेट मागे कोण आहे? याचा नेमका अंदाज बांधता येणे शक्य नाही. परंतु त्याची विक्री कोणा कोणाला केली जात होती. याचा शोध पोलिस सध्या घेत आहेत. त्यामुळे या मागचे सत्य लवकरच समोर येईल.