Central Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी `ही` बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Mumbai Central Railway : मुंबईची लाईफलाईन म्हणून (mumbai local) लोकलची ओळख आहे. मुंबईत दररोज हजारो नोकरदार व प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अनेकदा प्रवाशांचे सामान चोरीला जाते, वादविवाद होतात, महिलांसोबत छेडछेडीच्या घटना घडतात. तसेच रेल्वे स्थानकात संदिग्ध पध्दतीने फिरणे, एखादी बेवारस वस्तू ठेवणे असे काही प्रकार घडतात. याचपार्श्वभूमीवर या सर्व घटनांना लगाम लागावी म्हणून मध्य रेल्वेवरील (central railway) सुरक्षा दलाने नवीन शक्कल लढली आहे. यामुळे रेल्वे स्थानकात अशा घटना घडणार नाहीत.
मध्य रेल्वेवरील सुरक्षा दलावर (RPF) रेल्वेच्या मालमत्तेबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी असते. रेल्वे स्थानकातील या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जास्त मदत होते. मात्र आता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्यक्षात सुरक्षा कर्मचाऱ्यासाठी 40 बॉडी कॅमेरे लावण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेचे डबे, स्थानक परिसर, फलटावरील प्रवाशांच्या सर्व घडामोडींवर आता मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या गणेशावरील (खांद्यावर) बॉडी कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
वाचा : ट्विटर यूजर्सची बॅड मॉर्निंगने सुरुवात; लॉग इन करण्यात अडचण, युजर्स हैराण
दरम्यान रेल्वे स्थानक किंवा धावत्या रेल्वेत प्रवासी किंवा अन्य रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरवर्तवणुकही या कॅमेऱ्यात कैद होणार आहे. या कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त होणारे चित्रण 30 दिवसांपर्यंत सुरक्षित राहणार आहे. मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणाऱ्या टर्मिनस आणि काही स्थानकांतील घडामोडीवर या कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. याची निविदा प्रकिया पूर्ण झाली असून एक महिन्यात हे कॅमेरे मिळतील, असे त्यांनी सांगितले. सध्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील सुरक्षा दलाकडेही 40 बॉडी कॅमेरे आहेत.