Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराची ओळख या शहराच्या वेगामुळं आहे. कधीही न थांबणारं हे शहर मागील कैक वर्षांमध्ये पुरतं बदललं. शहरातील पायाभूत सुविधांपासून अगदी इथं नव्यानं उभ्या राहणाऱ्या इमारतींपर्यंत सारंकाही इतक्या वेगानं बदललं की जगाच्या पाठीवर या शहराची ओळख आता एका नव्या कारणामुळं होताना दिसत आहे. 


मुंबई देशातील सर्वात महाग शहर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायानगरी मुंबईमध्ये मागील काही महिन्यांमध्ये बांधकाम क्षेत्रात झालेली प्रगती पाहता शहरात नव्यानं घर घेण्याचं स्वप्न अनेकांच्याच अवाक्याबाहेर गेलं. निमित्त ठरलं ते म्हणजे शहरातील घरांच्या वाढलेल्या किमती. फक्त नव्या घरांच्याच बाबतीत नव्हे, तर आता याच मुंबईत भाड्यानं घर घेणंही अनेकांच्याच खिशाला परवडेनासं झालं आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली, जिथं शहरातील घरांच्या भाड्याचे दर सरासरी 10 टक्क्यांनी वाढल्याचं अधोरेखित करण्यात आलं. 


भाड्याच्या घरासाठी किती रक्कम मोजावी लागत आहे? 


मुंबईत भाड्याच्या घरासाठी प्रति चौरस फूट प्रति महिना 86 रुपये 50 पैसे इतकी रक्कम मोजावी लागत आहे. मुंबईमागोमाग महागड्या भाड्याच्या घरांच्या बाबतीत येणारं नाव आहे दिल्लीचं आणि त्यामागोमाग नवी मुंबईचं. जिथं अनुक्रमे प्रति चौरस फुटांसाठी अनुक्रमे 37.55 रुपये आणि 33.83 रुपये इतकी रक्कम मोजावी लागत आहे. 


का वाढले आहेत भाड्याच्या घराचे दर? 


मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुनी बांधकामं मागे पडत असून, तिथं पुनर्विकासाच्या कामांना वेग आला आहे. ज्यामुळं भाड्याच्या घरांची मागणी वाढल्यानं इथं मागणी आणि पुरवठ्याच्या सूत्रानुसार घरांच्या भाड्याचे दर वाढले आहेत. 


हेसुद्धा वाचा : 'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा 


घरभाडं वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे, घरांसह इतरही अनेक पायाभूत सुविधा सोबतीनं येत असल्यामुळं ही जास्तीची रक्कम आकारली जात आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या निमित्तानं वास्तव्यास असणाऱ्या मध्यमवयीन वर्गानं मोठ्या प्रमाणात घरं भाड्यानं घेतल्याची बाब या सर्वेक्षणातून निदर्शनास आली. साधारण 30 ते 45 वयोगटातील वर्गाची शहरात भाड्यानं घर घेण्याची मागणी वाढत असल्याचं इथं लक्षात आलं. थोडक्यात, मुंबई आणखी महागली!!!