Mumbai News : मुंबईत श्वास घेणंही धोक्याचं; शहरातील कोणत्या नागरिकांना सर्वाधिक धोका? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं...
Mumbai News : मुंबईतील हवा नेमकी किती प्रदूषित आहे, यासंदर्भातील माहिती देत डॉक्टरांनी शहरातील सद्यस्थितीसंदर्भात व्यक्त केली चिंता.
Mumbai News : वाढती लोकसंख्या, शहरांच्या मूळ रचनांमध्ये आणि आराखड्यांमध्ये सातत्यानं होणारे बदल आणि या बदलांच्या धर्तीवर सुरु असणारं मोठ्या प्रमाणावरील बांधकाम असंच काहीसं चित्र सध्या मुंबई शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील याच चित्रामुळं आणि वाढत्या प्रदुषणामुळं आता या मायानगरीच्या हद्दीत श्वास घेणंही कठीण झालं आहे. ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतना दिसतोय.
साधारण पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात झाल्या क्षणापासूनच मुंबईच्या प्रदूषण पातळीत चिंताजनक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. परिणामी शहरात श्वसनाशी संबंधित आजारांची रुग्णसंख्या सातत्यानं वाढताना दिसत आहे. हवेतील धुलिकणांचा सर्व वयोगटांवर वाईट परिणाम होत असून, अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे.
तज्ज्ञांच्या मते सकाळच्या सुमारास प्रदूषण हवेतील धुलीकण जमिनीलगत असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी चालण्यासाठी अर्थात मोठ्या संख्येनं मॉर्निंग वॉकसाठी बाहरे पडणाऱ्यांना न्यूमोनिया आणि दमा यांसारखे त्रास सतावताना दिसत आहेत. नागरिकांच्या या तक्रारी पाहता डॉक्टरांनीही सावधगिरीचा इशारा देत शहराची हवा खराब असून, हवेता दर्जा आणखी खालावल्यास गंभीर चित्र पाहायला मिळू शकतं असाही स्पष्ट इशारा दिला आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा
सध्या मुंबईतील या प्रदूषित हवेमुळे शहर आणि उपनगरांत सर्दी, खोकला, न्यूमोनियाची रुग्णसंख्या वाढली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वासोच्छ्वास प्रक्रियेत अडचणी येत असून, यामुळं त्यांच्या फुप्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. ज्यामुळं
प्रदूषणाचा स्तर जमिनीलगत असताना न चालण्याचं आवाहन नागरिकांना डॉक्टरांकडून केलं जात आहे.