Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत. ईस्टर्न फ्री वेला कोस्टल रोडसोबत थेट जोडण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) त्यांची 1.96 हेक्टर जमीन देण्यासाठी तयार आहे. बीपीटीने ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिल्यानंतर बोगद्याचे खोदकाम करण्यास सुरुवात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएने बीपीटीकडून भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाँचिग सॉफ्ट तयार करण्यासाठी ही जमिन प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला सोपवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 7,765 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमीनीच्या पृष्ठभागापासून 15-20 मीटर खोल असणार बोगदा 


6.23 किमी लांबीच्या या बोगद्यासाठी महाकाय टनल बोरिंग मशीन (टीबीएम)चा वापर होणार आहे. या बोगद्याचा व्यास 11 मीटर असणार आहे. तर, हा बोगदा जमीनीच्या पृष्ठभागापासून 15 ते 20 मीटर खाली असणार आहे. अशावेळी बोगद्याचे खोदकाम जमीनीच्या खालीच करण्यात येणार आहे. लाँचिंग सॉफ्टच्या माध्यमातून टीबीएम जमीनीच्या खाली उतरवण्यात येणार आहे. 


वाहनांसाठी बोगद्यात 2-2 लेन बनवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत बोगद्यात आणखी 1-1 अशा लेन बनवण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गाला कनेक्ट करण्यासाठी सध्याच्या फ्रीवेच्या जवळपास वायडक्ट आणि ओपन कट मार्ग बनवण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंबूर या दिशेने दक्षिण मुंबई किंवा उपनगरला जाणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध होणार आहे. 


काय आहे संपूर्ण प्रकल्प


ठाणे, चेंबूर येथून मुंबईला येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करण्यासाठी 9.23 किमी लांबीचा मार्ग तयार केला जात आहे. यात जवळपास 6.23 किमी मार्ग जमीनीच्या खाली म्हणजे अंडरग्राउंड असणार आहे. ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह टनल प्रोजक्ट कोस्टल रोड आणि पूर्व द्रुतगतीला थेट जोडणार आहे. प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डसाठी जवळपास 8 हेक्टर जमीनीची गरज भासणार आहे. बीपीटी यासाठी जमीन देण्यास तयार आहे. 


एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून जाणारी वाहने थेट ट्रान्सहार्बर लिंकला जोडली जाणार आहेत. यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अंतर खूप कमी होणार आहे. मुंबईच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. 


या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?


- प्रकल्पासाठी एकूण 7,765 कोटींचा खर्च येणार आहे
- प्रकप्लाची एकूण लंबी जवळपास 9.23 किमी इतकी आहे. 
- 6.23 किमी अंडरग्राउंड बोगदा असणार आहे
- बीपीटी 1.96 हेक्टर जमीन देण्यास तयार
- 8 हेक्टर जमीनीची गरज फक्त कास्टिंग यार्डसाठी