Mumbai News : राज्यात शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यादरम्यान सुरु असणाऱ्या चर्चांना आता आणखी नवं वळण मिळालं. निमित्त ठरली ती म्हणजे अजित पवार आणि काही बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीत केलेली बंडखोरी. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षातून काढता पाय घेत अजित पवार आणि त्यांच्या समर्थनात असणाऱ्या नेत्यांनी नवा गट स्थापन करत सत्तेत असणाऱ्या भाजपशी हातमिळवणी केली. महायुतीत राहून जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याची आश्वासक वक्तव्यही केली. या साऱ्यामध्ये पवार कुटुंबातील दुरावा बऱ्याच चर्चांना वाव देणारा ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या एकसंध कुटुंबात नेमकी कोणामुळं फूट पडली, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आव्हाडांनी राष्ट्रवादीतील एका नेत्यावर गंभीर आरोप केले. अजित पवार गटात गेलेल्या या नेत्यानंच पवारांच्या कुटुंबात फूट पाडली असंही ते म्हणाले. 


आव्हाडांनी आरोप केलेले हे नेते म्हणजे सुनिल तटकरे. 'शरद पावरांचं घर खरच कोणी फोडलं असेल तर ते सुनील तटकरे यांनी...', असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी तटकरेंवर हल्लाबोल केला. 'धरणात मुतल्याच्या निर्णयाशिवाय अजितदादांनी केलं'? काय अस विचारत आव्हाडांनी अजित पावरांची नक्कल केली.


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : आशिष शेलार बॉलिवूडच्या भाईजानच्या भेटीला; लंच डिप्लोमसीदरम्यान नेमकी कसली चर्चा?  


कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. सुनिल तटकरे यांनीच पावरांचं घर फोडल्याचा आरोप करत त्यांनी अजित पावरांचं शरद पावरांशिवाय काहीही कर्तृत्व नसल्याची टीका करत अजित पावरांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं. 


शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये असणारे मतभेद मागील काही दिवसांपासून सातत्यानं समरो येत आहेत. त्यातच 2019 च्या निवडणुकीदरम्यान रोहित पवार भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हणत त्यांच्यावर तटकरेंनी हल्लाबोल केला होता. ज्यानंतर तुम्ही, अजित पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये अधिृत प्रवेश कधी जाहीर करताय असा बोचरा सवालच रोहित पवार यांनी केला होता. त्यातच आता तटकरेंवर आव्हाडांनी ही घणाघाती आरोप केला आहे. आता याचं उत्तर तटकरे कसं देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.