Maurice Naronha : शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मुंबईत गुरुवारी फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांना स्थानिक कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. मॉरिसच्या ऑफिसमध्ये अभिषेक घोसाळकर सोफ्यावर बसून स्थानिक नागरी समस्यांबद्दल ट्रायपॉडवर ठेवलेल्या मोबाईल फोनवर लोकांशी बोलत होते. त्याचवेळी संवाद संपल्यानंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉरिसने घोसाळकर यांची हत्या करण्यासाठी आधीपासून तयारी केल्याचे दिसून येत आहे. फेसबुक लाईव्ह संपताच घोसाळकर उभे राहिले आणि त्याचवेळी मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली. दोघांमध्ये सुरुवातीला वाद होता आणि त्यानंतर ते एकत्र आले होते. मात्र अचानक मॉरिसने गोळ्या झाडून घोसाळकर यांचा खून केला. या सगळ्या घटनेआधी सोशल मीडियावर मॉरिसने शेवटची सूचक पोस्ट केली होती.


आता मॉरिस नोरोन्हा 10 दिवसांपूर्वीची फेसबुक पोस्ट समोर आली आहे. 29 जानेवारी रोजी त्याने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्याच्यासोबत त्याने एक कॅप्शन लिहीले होते. "तुम्ही अशा माणसाला हरवू शकत नाही ज्याला वेदना, नुकसान, अनादर आणि नकार याची पर्वा नाही," असे मॉरिस नोरोन्हा याने म्हटलं आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकरांवर हल्ला केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडली. घोसाळकर यांना तातडीने बोरिवली येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घोसाळकार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णलयात नेण्यात आला. तर मॉरिसचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला.


कोण आहे मॉरिस नोरोन्हा?


मॉरिस नोरोन्हा हा बोरिवलीमध्ये मॉरिस भाई म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने स्वत:ला पुरस्कारप्राप्त समाजसेवक, कोविड योद्धा आणि समाजसेवक असल्याचे सांगितले होते. फेसबुक लाइव्हमध्ये अभिषेक घोसाळकर यांनी 10 फेब्रुवारी रोजी नियोजित नाशिकच्या नोरोन्हाच्या सहलीचा संदर्भ दिला होता. ते तिथे एका चर्चला भेट देणार होते. घोसाळकर आणि नोरोन्हा यांच्यात वैर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. हे दोघे उघडपणे कार्यालयात त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच दोघांना एकाच प्रभागातून निवडणूक लढवायची होती.