मुंबई : अँटिलिया बाहेरील विस्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी एपीआय सचिन वाझेच्या (Sachin Vaze) अडचणीत वाढ होताना दिसतेय. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा  (NIA)टीम त्याला घेऊन सोमवारी रात्री उशिरा मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावर पोहोचली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयए(NIA)च्या पथकाने सीएसटी रेल्वे स्थानकावर सीन रिक्रिएशन केले. सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे अधिक मजबूत करण्यासाठी सचिन वाझेला प्लेटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर नेले. येथे सीसीटीव्ही पुरावा क्रॉस-व्हेरिफाईड करता यावा यासाठी रेड-टॅपिंग करून सचिन वाझेला चालवून सीन रिक्रिएशन झाले. 


चौकशी दरम्यान सचिन वाझेने एनआयएला (NIA) सांगितले की,  4 मार्च रोजी सीएसटी रेल्वे स्टेशन (CST Railway Station) वरून कळवा स्टेशनला गेलो होतो. त्याआधारे एनआयए टीम सचिन वाझेला (Sachin Vaze) घेऊन आधी सीएसटी आणि नंतर कळवा स्थानकावर पोहोचली.



एनआयएच्या पथकाने सचिन वाझेसोबत हा सीन रिक्रिएट केला तेव्हा फॉरेन्सिक टीमही तिथे हजर होती. सीएसटी येथे संपूर्ण प्रक्रिया पार केल्यावर एनआयएची टीम सचिन वाझेसह कळवा रेल्वे स्थानकात गेली. तिथे साधारण 45 मिनिटे त्याला वाहन चालवायला सांगून सीन रिक्रिेएट करण्यात आला. यानंतर एनआयएची टीम रात्री सचिन वाझेला घेऊन दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयात पोहोचली.


सचिन वाझे 7 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात आहे. विशेष कोर्टाने एनआयएला त्याला सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यासह कोर्टाने 7 एप्रिलला पुढील हजेरीदरम्यान आरोग्याविषयी आणि आजारांबद्दल तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.