मुंबई : मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू होणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी पहिला निर्णय मुंबई नाईट लाईफचा घेतला आहे. ही अशी मुंबई आता रात्रभर दंगामस्ती करणार आहे. २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबई ट्वेंटी फोर बाय सेव्हन एन्जॉय करणार आहे. कारण मुंबईत नाईट लाईफ सुरू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईतली रेस्टॉरंटस, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना रात्रभर शॉपिंग करता येणार आहे. सिनेमा पाहता येणार आहे. रात्री रेस्टॉरंटमध्ये खाता-पिता येणार आहे. आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पर्यटन मंत्री होताच त्यांनी हा पहिला निर्णय घेतला आहे.


आहार संघटनेनं नाईट लाईफच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामुळे रोजगार वाढले अशी प्रतिक्रिया आहार संघटनेचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी दिली आहे.


भाजप मात्र या निर्णयावर फारशी आनंदी नाही. कारण त्यांना रात्रीची शांतता बिघडण्याची काळजी वाटते आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नाईट लाईफमुळे नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर याला कडाडून विरोधी करु अशी भूमिका घेतली आहे. 


या निर्णयामुळे मुंबईत पर्यटन व्यवसाय वाढणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. दिवसभर व्यस्त असणाऱ्या मुंबईकरांना अनलिमिटेड एन्जॉयमेंट मिळणार आहे. पण त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण, मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये असणारं मनुष्यबळ आणि नाईट लाईफला खऱोखर मिळणारा प्रतिसाद ही काही आव्हानं असणार आहेत.