`बघतोस काय XXX...` गोरेगावमध्ये चक्क सिग्नल साईन बोर्डावर झळकला अश्लिल संदेश
वाहनचालकांना खबरदारीचे संदेश देणाऱ्या डिजिटल साईन बोर्डवचा अश्लिल संदेश वाचून वाहनचालक गोंधळले, पोलिसांनी गंभीर दखल घेत दिले चौकशीचे आदेश
मुंबई : एकाद्या कंपनीची किंवा बँकेची साईट हॅक (Hack० करण्याचे प्रकार अनेकदा ऐकले असतील. किंवा ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या खातेदारांचं बँक अकाऊंट हॅक करुन लाखो रुपयांचा गंडा (Online Fraud) घातल्याच्या घटनाही घडत असतात. पण एका हॅकर्सने चक्क रस्त्यावरचा डिजिटल साईन बोर्डच (Digital Sign Board) हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोरेगावमधल्या (Goregaon) ओबेरॉय मॉलजवळच्या (Oberoi Mall) सिग्नलवर हा प्रकार घडला आहे. याआधी पवई आणि हाजी अली इथेही अशीच घटना घडली होती.
डिजिटल साईन बोर्डावर अश्लिल संदेश
गोरेगाव पूर्वेकडच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Wester Express Highway) शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. एक्स्प्रेस हायवेवरील ओबोरॉय मॉल सिग्नलजवळ असणाऱ्या डिजिटल साईन बोर्डवर अचानक एस संदेश (Message) आला. हा संदेश वाचून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा धक्का बसला. कारण या डिजिटल साईन बोर्डवर चक्क अश्लिल संदेश झळकत होता. काही वाहन चालकांनी याचे फोटो काढले. नक्की हा काय प्रकार आहे असा प्रश्न वाहनचालकांना पडला.
काय होता संदेश?
कोणतीही दुर्घटना घडू नये साठी रस्त्यांवर अनेक ठिकाणी डिजिटल साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. यात वाहन चालकांसाठी खबरदारीचे संदेश देण्यात येतात. वाहन हळू चालवा, सीटबेल्ट लावा, दारू पिऊन गाडी चालवून नका अशा सूचना या माध्यमातून केल्या जातात. काही ठिकाणी तापमानाच्या नोंदीही दर्शवल्या जातात. पण ओबेरॉयजवळच्या डिजिटल साईन बोर्डवर शुक्रवारी दुपारी जो संदेश झळकला, त्यात चक्क अश्लिल शब्द वापरण्यात आला होता. हा संदेश होता 'बघतोस काय XXX, गाडी नीट चालव' त्याच्या खालच्या पट्टीवर Please Drive Safely असा संदेही देण्यात आला होता.
पोलिसांनी दिले चौकशीचे निर्देश
डिजिटल साईन बोर्डावर झकळत असलेल्या या अश्लिल संदेशामुळे वाहनचालक हैराण झाले, ही घटना दिंडोशी पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी याप्रकरणाची गंबीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. वास्तविक हा डिजिटल साईन बोर्डन हॅक करुन हा खोडसाळपणा केला होता.
हाजी अली, पवईतही असाच प्रकार
मुंबईतल्या हाजी अली दर्गा इथल्या सिग्नलवरही दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. इथल्या डिजिटल साईन बोर्डवर दररोज गांजा प्या, असा मेसेज झळकत होता. तर नोव्हेंबरमध्ये पवई प्लाझा मॉलच्या बाहेर लावण्या आलेल्या डिजिटल जाहीरात बोर्डावर 'बघतोस काय XXX' असा संदेश दाखवला जात होता.