Mumabi Gang Rape : मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींपैकी एक मुलगा पीडित मुलीचा चांगला मित्र आहे. या मित्रानेच पीडित मुलीला त्याच्या मित्राच्या घरी नेलं. तिथे पीडित मुलीवर मित्र आणि त्याच्या इतर पाच मित्रांनी मिळून सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला. आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आहेत. मुंबईतल्या लोअर परेल (Mumbai Lower Parel) भागात ही घटना घडली आहे.
काय आहे नेमकी घटना?
23 डिसेंबरला पीडित मुलगी त्याच्या मित्राबरोबर घरी गेली. तिथे आधी मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याच्या पाच मित्रांनीही तिच्यावर बलात्कार केला. यात तीन अल्पवयीन (Juvenile) आरोपी आहेत. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात (N M Joshi Police Station) तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सर्व सहा आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
आरोपींपैकी तीन अल्पवयीन आरोपींची डोंगरी इथल्या बालसुधारगृहात (Juvenile Rehabilitation Centre) रवानगी करण्यात आली आहे. तर इतर तीन आरोपींना पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान पोलीस आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही तपास करत आहेत.