Mumbai Weather News : महाराष्ट्रातून पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच पुन्हा एकदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात अंशत: पावसाळी वातावरण तयार झालं. त्यातच हवामान विभागानं शहराच्या नजीकच समुद्रात वादळ घोंगावत असल्याचा इशारा दिला आणि यंत्रणांनाही सतर्क केलं. याच धर्तीवर IMD कडून महाराष्ट्रातील वातावरणातही बदल होणार असल्याचं सांगण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रात सध्या दक्षिण पूर्व आणि लगतच्या पूर्व मध्य भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असून या वाऱ्यांचं रुपांतच चक्रीवादळात होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. पुढे हे वारे पश्चिम उत्तर पश्चिमेला पुढे जाणार असून, 21 ऑक्टोबरपर्यंत रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची आणि कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होत असली तरीही त्याचं महाभयंकर वादळात रुपांत होण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण, तरीही यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 


सहसा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा काळ बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्ण तापमानामुळं वादळसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यास पूरक ठरतो. 


मागील वर्षी अरबी समुद्रात एकही चक्रीवादळाची निर्मिती नाही... 


2022 मध्ये अरबी समुद्रामध्ये मान्सूननंतरच्या कालावधीत कोणत्याही चक्रीवादळाची निर्मिती झाली नव्हती. तुलनेनं बंगालच्या उपसागरामध्ये मात्र सितरंग आणि मंदौस अशी दोन चक्रीवादळं पाहायला मिळाली होती. आतापर्यंत अरबी समुद्रामध्ये जी चक्रीवादळं तयार झाली, त्यांचा मार्ग आणि संपूर्ण प्रवास याविषयी काहीच गोष्टींचे तंतोतंत तर्क लावता आले नव्हते. आताही 'तेज' चक्रीवादळासोबत असंच घडताना दिसत आहे. त्यामुळं आता यंत्रणाही या चक्रीवादळावर लक्ष ठेवून आहेत. शिवाय परिस्थिती गंभीर वळमावर पोहोचल्यास मासेमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात येईल.


हेसुद्धा वाचा : ...तर पत्नीला पोटगी द्यायची गरज नाही; पगाराचा उल्लेख करत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय



अरबी समुद्राच्या मध्यभागावर वादळं पोहोचल्यानंतर ती सोमालिया, अदेन, येमेन आणि ओमानच्या दिशेनं पुढे जातात. फार कमी प्रसंगी वादळं गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीकडे वळतात, अशी माहिती स्कायमेटनं दिली आहे.