मुंबई : कानून के हाथ बहुत लंबे होते है... या फिल्मी डायलॉगचा प्रत्यय आबिद अली मुन्सफी सैय्यद याला नुकताच आला. गेल्या २१ एप्रिलला वाशी टोल नाक्यावर टोल न भरताच आबिद अलीनं पळ काढला होता. अगदी टोलनाक्यावर लावलेलं प्लास्टिकचं बॅरिकेडही त्याच्या गाडीनं बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेलं. याबाबत मुंबई पोलिसांकडं तक्रार आल्यानंतर अवघ्या काही दिवसात पोलिसांनी त्याचा छडा लावला. गाडीसह त्याला अटक करून नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी गाडी मालक आबिदअलीवर कलम 279 आणि 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनीच ट्वीट करून ही माहिती दिलीय. तुम्ही पळू शकता, लपू शकता, पण कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही, असं मुंबई पोलिसांनी सगळ्यांना बजावलंय.